*पेटले बर्फ,वितळले रक्त*
पेटले बर्फ
वितळले रक्त
वितळलेल्या रक्तावर
राखती आपले तख्त..... ||1||
हमि अस्तु फिरदौस
करून टाकला वैराण
कौमी वादाला येई
भरती नि ऊधाण...... ||2||
कश्मिर हमारा है
हाच नुसता धोशा
आतंकी लुटतात
पदर आणि गोषा ......||3||
बंदूकीच्या जोरावर
धर्म राखायची बात
बिचारी जनता बसते
बघत भेदरून घरात....... ||4||
दोघांच्या भांडणात
बाहेरचे घेती फायदा
आतल्यांच्या नशीबी
जुलमाचा कायदा .......||5||
सरणार का कधी
पृथ्वीच्या स्वर्गाचे हाल
की सरून जाणार
शतके शतके न् साल..... ||6||
प्रविण म्हात्रे , पिरकोन
मो.नं.8097876540
No comments:
Post a Comment