Friday, March 29, 2019

                                                               उक्षी*

उक्षी ही सहयाद्रीच्या डोंगररांगात आढळणारी एक झुडूपवजा वनस्पती आहे.संस्कृतमध्ये श्वेतघातकी, हिंदीत कोकरे म्हणून ओळखली जाणारी आणि विविध औषधी गुणधर्मामुळे तसेच सरपण म्हणून पूर्वी घराघरांत परिचित होतीच.
खोकला , पोटातील जंत यावर औषधी म्हणून उक्षीचा पाला उपयोगी पडतोच. पण जंगलात सरपण गोळा करायला जाणा-या बहूतेक स्रिया सहज चालताचालता मूठभर उक्षीच्या कोवळया पानंचा बकाणा भरून चावून खात असत, ज्यामुळे पोटदुखी होत नाही असे त्या सांगतात.
उक्षीच्या मुळाजवळ असणारी अक्रोडासारखी गाठ (जी बहूतेक वनस्पतीने मूळाजवळ साठवलेल्या नायट्रोजनची गाठ असावी) आदिवासी लोक ती ब-याच वेळा कुणाला गालफुगी (गालफी) झाली असेल तर ऊगाळून लावायला आणून देत असत.
लहानपणी गुढीपाडव्याच्या पाटीपूजनाला फुले कुठेच मिळत नसत तेव्हा गावाशेजारी असलेल्या टेकडीवर (काशेडोंगरी) असणारी फुललेली उक्षी हमखास मदतीला यायची.
प्रविण म्हात्रे , पिरकोन उरण-रायगड


         *

1 comment: